अपेक्षित आरक्षण न निघाल्याने अनेकांचे स्वप्न भंगले
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी तातेराव बनसोडे)
फुलंब्री तालुक्यातील 71 सरपंच पदाचे सोडत पध्दतीने आरक्षण शुक्रवार रोजी उपविभागीय अधिकारी फुलंब्री/ पैठण नीलम बाफना यांनी जाहीर केले तहसिल कार्यालय सभागृह फुलंब्री येथे आयोजीत केलेल्या विशेष बैठकीतील आरक्षण सोडत संपन्न झाले त्यात अनुसूचित जाती साठी 3 ,अनुसूचित जाती महिला 4,अनुसूचित जमाती महिला 1,ना.म.प्र 10, नामप्र महिला 10, सर्वसाधारण 21,सर्वसाधारण महिला 22 अश्या प्रकारे सरपंच पदाचे सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले या वेळी सांडू जाधव, सुदाम मते, अंबादास गायके, गोपाल वाघ, बाळासाहेब तांदळे, भानुदास तायडे, मयुर कोलते, सुचित बोरसे, राजेंद्र काळे, जगन्नाथ दाढे, अजित भोपळे, राजेंद्र चव्हाण, इलियास शहा, संतोष तांदळे, कैलास पवार, धनसिंग नागलोत, प्रभाकर सोटम, राजेंद्र डकले, कैलास कुंटे, ज्ञानेश्वर जाधव, योगेश जाधव, अंकुश ताठे, प्रदीप ताठे, गोविंद गायकवाड, विजय आहेर, विजय जाधव, ज्युसा पटेल.यांच्या सह तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती
गाव निहाय आरक्षण
अनुसुचित जाती
1)पिपंळगाव वळण 2) वाहेगाव 3) साजुळ
अनुसूचित जाती (महीला)
1) बिल्डा 2) शिरोडी बु. 3) लालवण 4) वारेगाव
अनु. जमाती महिला
1) लेहा जाहगीर
ना.मा.प्र.
1)पाल 2) लहाण्याची वाडी 3) बाबरा 4)बाभूळगाव खु. 5 ) आडगाव बु. 6)साताळा बु. 7)पाथ्री 8)पिरबाववडा 9)गिरसावळी 10)गेवराई गुंगी
ना.मा.प्र. (महीला)
1) कान्होरी 2) निधोना 3) सोनारी बु. 4) खामगाव 5) बोरगाव अर्ज 6) शेलगाव खु. 7) मारसावळी 8) वाघालगाव 9)आडगाव खु. 10) धानोरा
सर्व साधारण
1)मुर्शिदाबादवाडी 2)चिंचोलि बु. 3)शिरोडी खु. 4) वावना 5)चिंचोलि न. 6) उमरावती 7) सताळा पिप्री 8) जळगाव मेटे 9) वडोद बाजार 10) नरला 11) धामणगाव 12) हिवरा 13) किनगाव 14) वाघोळा 15) ममनाबाद 16) वाकोद 17) महालकिन्होळा 18) नायगाव 19) जातेगाव 20) टाकळी कोलते 21) निमखेडा
सर्व साधारण महिला
1) गणोरी 2)शेलगाव जानेफळ 3)नायगव्हाण 4)डोगरगाव कवाड 5) दरेगाव दरी 6) बोधेगाव बु. 7)विरमगाव 8)डोगरगाव शिव 9)सुलतानवाडी 10)आळद 11)लोहगडनांद्रा 12)पिंपळगाव गांगदेव 13)रिधोरादेवी 14) तळेगाव 15)वानेगाव बु 16)बोधेगाव खु. 17) पेंडगाव आंळद 18)शेवता खु. 19)गेवराई पायगा 20) रांजणगाव 21)कान्हेगाव 22) जातवा
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा