आंतरराष्ट्रीय केक शिल्प स्पर्धेत पटकावले बक्षीस
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
जगविख्यात 'केक मॅगझीन (IICM)' या संस्थे द्वारा आयोजित जागतिक Incredible अद्भूत केक प्रतियोगीतेतील Global Excellence Awards अंतर्गत Global Sculpted Cake Artist of 2025 मिळविण्याचा मान जातेगाव ची सुकन्या सौ दीपा गायकवाड-कारंडे यांना मिळाला आहे. भारता बरोबरच जातेगावसाठी ही मोठ्या गौरवाची उपलब्धी आहे. या प्रतियोगीतेमध्ये संपूर्ण जगातील मान्यवर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.11एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या शानदार समारोहात हे अवॉर्ड प्रदान करण्यात आले
सौ दीपा या मुंबई तील विश्वविख्यात 'जे जे कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. कमर्सिअल आर्ट्स नंतर गेल्या 6 वर्षांपासून त्या Incredible Cake Art मध्ये काम करत आहेत.
त्यांनी 2024-25 मध्ये लंडन येथे संपन्न झालेल्या DM Awards प्रतियोगीते मध्ये Global Edible Sculptor of the year 2024 हे अवॉर्ड प्राप्त केले आहे.
सौ दीपा यांचे वास्तव्य सध्या अमेरिकेतील केंटकी स्टेट मध्ये आहे. तेथे त्यांनी ACA (American Cake Awards) प्रतियोगीता अनेक वर्षे जिंकलेली आहे.
सौ दीपा यांना त्यांच्या यशाचे गमक विचारले असता त्या म्हणाल्या की मिळालेले सर्वच अवॉर्डस मी अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित करते. माझे प्रयत्न, परिश्रम,सातत्य,सर्जनशीलता आणि स्वामींची कृपा! एका कलाकाराला अत्यावश्यक असे मार्गदर्शन, creativity, सर्जनशीलता दिली ती अक्कलकोट गुरुपीठाचे सांप्रत अधिकारी डॉ पुरुषोत्तमजी महाराजांनी ! बालपणापासून श्री उपदिष्ट नित्य अग्निउपासना- अग्निहोत्र हे माझ्या जीवनाचे सूत्र आहे.
सौ दीपा या जातेगाव येथील निवृत्त बँकर श्री नामदेव-नाना गायकवाड यांच्या कन्या आहेत.दिपा गायकवाड या पारनेर तालुक्यातील कन्या असल्यामुळे त्यांचे सर्व पारनेर तालुका जातेगाव परिसराने कौतुक केले आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा