शिवजयंतीच्या मुहूर्तावर वैराटगडावर राबविली होती स्वच्छता मोहीम
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वराज्य सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल तर्फे सुरू असलेले गड किल्ले स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहेत. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आत्ताच वैराटगडावर स्वच्छता मोहीम नुकतीच पार पडली. शिवरायांच्या पावन भूमीत सातारा जिल्ह्यात पंचक्रोशीत वाई तालुक्यातील तरुण-तरुणी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी व कार्यांनी प्रेरित झालेल्या तरुण-तरुणींनी एकत्र येऊन सातारा जिल्ह्यातील सर्व गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवण्याचे काम हाती घेतले आहे. ना जात ना धर्म रयतेचा विकास हेच स्वप्न हे ब्रीद घेऊन निर्माण झालेली संघटनेने किल्ले वैराटगडाची स्वच्छता करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक किल्ल्यावर स्वराज्याच्या मातब्बर व्यक्तींच्या समाध्या ढासळलेल्या आहेत त्यांची डागडुजी गडकोट किल्ले संरक्षण तसेच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवणे असे उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येणार असून या संघटनेच्या माध्यमातून दवाखाने, शाळा, बस स्थानके विविध धार्मिक स्थळे व सामाजिक उपक्रम असणारे ठिकाणी स्वच्छता आयोजित करण्यात येणार आहे.या संघटनेचे मोलाचे काम दिसून आल्यानंतर माननीय खासदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलच्या वाई तालुका अध्यक्ष अक्षय शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यांच्या समवेत शिवप्रेमी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा