ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
व्याहळी पुनर्वसन ता. वाई महसूल हद्दीत डोंगरामध्ये वैराटगड पायथ्याशी धोकादायक उत्खनन सुरू असून यामुळे येथील राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा धोका निर्माण झाला असल्यामुळे या हद्दीमध्ये येणाऱ्या मालुसरेवाडी व्याजवाडी कडेगाव व व्याहळी शेलारवाडी येथील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत कडेगाव व्याहळी पुनर्वसन या ग्रामपंचायतीने ठराव करून जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालय वाई उपविभागीय अधिकारी प्रांत वाई यांना लेखी सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात व्याहळी पुनर्वसन तालुका वाई येथील डोंगर पायथ्याशी सर्वे नंबर 17/1 व 17 / 2 मध्ये अभिषेक प्रताप यादव व अल्पना प्रताप यादव यांच्या मालकीच्या क्षेत्रात धोकादायक उत्खनन चालू असून या ठिकाणी 15 ते 20 कुटुंब कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत अतिवृष्टी किंवा भूस्खलनमुळे भविष्यात या कुटुंबांना जीवित किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेच वाई बाजू कडून ही वैराटगडावर जाण्यासाठी या बाजूचे ग्रामस्थ व पर्यटक उपयोग करीत असतात एकीकडे शासन गड संवर्धन जपण्यासाठी प्रयत्न करत आहे तसेच वाई तालुक्यातील कित्येक खाणी शासनाने बंद केल्या आहेत.
परंतु सर्व नियम बाजूला ठेवून व्याहळी पुनर्वसन हद्दीत धोकादायक उत्खनन सुरू आहे या धोकादायक सुरू असलेल्या उत्खनवर कार्यवाही होऊन ही खाण बंद करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे सत्तर ग्रामस्थांनी सह्या केलेले निवेदन देण्यात आले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा