maharashtra day, workers day, shivshahi news,

मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न

सोहळ्यास प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती

Bhoomipujan of indoor stadium, matrubhumi pratisthan, barshi, shivshahi news, solapur,

शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने कुर्डूवाडी-लातूर बायपास येथील पोद्दार इंग्लिश मीडियमच्या मागे उभारल्या जाणाऱ्या भव्य भूमीवर इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते  उत्साहात पार पडला. या सोहळ्यास प्रतिष्ठित मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव मा. संतोष पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव मा. अविनाश सोलवट, तसेच उपविभागीय अधिकारी (सोलापूर १) मा. सदाशिव पडदूने हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रशांत कानगुडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

या प्रसंगी मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे यांनी या प्रकल्पामागील भूमिका विषद करताना सांगितले की, हा प्रकल्प क्रीडा व युवकवर्गासाठी प्रेरणादायी ठरेल. किरण देशमुख सर यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रीडा विभागाला कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

यावेळी संतोष पाटील यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य आणि मदतीचे आश्वासन देऊन बहुमोल मार्गदर्शन केले.  अविनाश सोलवट यांनी सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हा प्रकल्प जागतिक स्तरावर कसा नेऊ शकतो, याबाबत आपले विचार मांडले. ते पुढे म्हणाले, हे इनडोअर स्टेडियम आणि मल्टिपर्पज हॉल भविष्यात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त व सामाजिक स्तरांवर माईल स्टोन ठरेल.

कार्यक्रमाच्या अखेरीस मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी आभार व्यक्त करताना मदतीचे महत्त्व किती यावर भाष्य केले. त्यांनी गिरीश देशपांडे यांच्याशी घडलेल्या एका सकारात्मक प्रसंगाचा उल्लेख करत, सढळ हाताने मदत केल्याने कुटुंबाबरोबर समाजात सकारात्मक बदल कसा घडू शकतो, याचे उदाहरण विशद करून भविष्यात मातृभूमी विविधपातळ्यांवरून सामाजिक स्तरावर रोल मॉडेल म्हणून कार्यरत राहील.

या कार्यक्रमात प्रतिष्ठान पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, क्रीडाप्रेमी पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी एक नवा अध्याय सुरू झाला असून, यामुळे बार्शी शहर व परिसराच्या विकासात नक्कीच महत्त्वाची भर पडणार आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !