किनगाव राजा चे पोलीस निरीक्षक विनोद नरवाडे यांचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सोशल मीडियावर आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणारे किंवा समाजा- समाजात वाद निर्माण होईल असे स्टेटस ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत समाज माध्यमांवर प्रक्षोभक पोस्ट्स व स्टेटस ठेवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
"कोणीही जात, धर्म, सामाजिक गटांविषयी अपमानकारक स्टेटस ठेवून किंवा पोस्ट करून कायदा हातात घेत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल." असे ठाणेदार नरवाडे यांनी स्पष्ट केले.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले असून, "कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि संशयास्पद स्टेटस किंवा पोस्ट आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा इशारा दिल्यानंतर नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून, सोशल मीडियावर गैरवापर करणा-यांवर प्रशासन आता अधिक तीक्ष्ण नजर ठेवत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा