सायरन वाजवत वाई शहरात पोलिसांचे पथसंचलन
शिवशाही न्यूज, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई पोलिसांचे वाई शहरात व पोलिस ठाणे हद्दीतील गावागावात आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणुन वरील प्रमाणे सण साजरे करत असताना वाई शहरात विविध जाती धर्माच्या नागरिकांन मध्ये पिढ्यांन पिढ्या चालत आलेले सलोख्यांचे संबंध कायम स्वरुपी आबाधीत रहावेत अशी भावना वाई. पोलिसांच्या ह्रदयात घर करून बसलेली आहे .अशा भाईचाऱ्याला कोणा विघ्न संतोषी लोकांची नजर लागुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता वाईच्या महागणपती मंदिर येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम सराव व रुट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च हा वाई पोलीस ठाणे - पोस्ट ऑफिस - नविन पूल - किसनवीर चौक - पी.आर.चौक - जामा मस्जिद - ताहेरशाह मस्जिद - चावडी चौक - दातार हॉस्पिटल - शिवसेना भवन - किसनवीर चौक - आमंत्रण चौक - शिवाजी चौक - परत पोलीस ठाणे असा काढण्यात आला.
या रुटमार्च मध्ये वाईचे डिवाय एसपी बाळासाहेब भालचीम वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज बिपिन चव्हाण तसेच महाबळेश्वर पाचगणी मेढा वाई येथील पोलिस अधिकारी व अंमलदार आणी जातीय दंगल काबु पोलिस पथक यांचा सहभाग होता. सदर जातीय दंगा काबू योजने करिता तसेच रूट मार्च करता ९ पोलीस अधिकारी, ४० पोलिस अंमलदार, ९ गृहरक्षक, SRPF ९ जवान हे लाठी, काठी हेल्मेट, ढाल, गॅस गन , रायफलसह उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा