मरवडे फेस्टिवल कार्यक्रमात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
छत्रपती परिवार, मरवडे, ता.मंगळवेढा आयोजित 'राैप्यमहाेत्सवी मरवडे फेस्टिवल - २०२५' अंतर्गत राज्यस्तरीय साहित्य गाैरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्व.मुक्ताबाई आप्पा कुंभार साहित्य गाैरव पुरस्काराने लेखक इंद्रजीत पाटील यांना बहारदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. त्यांच्या 'शेलक्या बारा' या कथासंग्रहास हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढाेबळे, प्रमुख पाहुणे दत्तात्रय पवार साहेब, प्रदीप खांडेकर, अंबादास कुलकर्णी, शशिकांत चव्हाण, सुधाकर मासाळ इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व राेख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप हाेते. अल्पावधीतच या कथासंग्रहास नववा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून त्यांच्या 'कळ पाेटी आली ओठी' ' या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहासही यावर्षीचे पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
लेखक इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत असून पंडितराव लाेहाेकरे, माधवराव कुतवळ, अमाेल कुतवळ, भागवत उकिरंडे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब पाटील, संजय भड, अमाेल देशमुख, जीवराज गरड यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रस्तुत पुरस्कार वितरण सोहळ्याचे सुरेश पवार गुरूजी, त्यांचे सहकारी व गावकरी मंडळींनी उत्तम नियाेजन केले हाेते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा