maharashtra day, workers day, shivshahi news,

सातारा पुणे महामार्गावर इनोव्हा कार व कंटेनरच्या धडकेत दोन महिला महिलांचा जागीच मृत्यू

दोन गंभीर जखमी तर इनोव्हा कारचा अक्षरशः चक्काचूर

सातारा पुणे महामार्गावर पाचवड गावच्या हद्दीत इनोव्हा कार चालकाचा ताबा सुटल्याने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या भिषण अपघातात दोन महिला महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी

Two women died on the spot in the accident, wai,satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा पुणे महामार्गावर पाचवड ता.वाई गावच्या हद्दीत इनोव्हा कारला झालेल्या भीषण अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या तर दोन गंभीर जखमी झाले आहेत . जखमींना तातडीने  पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.हा अपघात एवढा भिषण होता कि कारचा. चक्काचूर झाला आहे. 

सलमा इरफान मोमीन वय ४० राहणार सांगली. व नहीदा समीर शेख वय ३९ राहणार शनिवार पेठ सातारा अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत .

भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी दिलेली माहिती अशी की सलमा इरफान मोमीन वय ४० राहणार सांगली नहीदा समीर शेख वय ३९ राहणार शनिवार पेठ सातारा ‌ बशीर महम्मद पठाण वय ७३ राहणार शनिवार पेठ सातारा . सलमान रफिक पठाण वय २७ राहणार जवळवाडी ता.मेढा .असे चौघेजण येणाऱ्या ईदच्या सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्या साठी सातारहुन इनोव्हा कार क्रमांक एम .एच .११ बिग .के .१५६७ मधुन सातारा पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेने. रविवार दि .९ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जात असताना त्यांची कार भरघाव वेगात पाचवड  ता .  वाई गावच्या हद्दीत ९ /४ ० वाजता आली त्यावेळी महामार्गावर त्यांच्या समोर नादुरुस्त एक लांबलचक असणारा कंटेनर बंद अवस्थेत उभा होता तो कार चालकाने पाहताच त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरघाव वेगात असणार्या कारने पाठीमागून उभ्या कंटेनरला जोराची धडक दिल्याने कारमधील सर्वजण बाहेर फेकले गेले.

हि धडक एवढी भिषण होती‌ कि. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह एक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात घडल्या ‌वेळे प्रसंगी वाईचे डिवाय एसपी बाळासाहेब भालचीम हे सातारहुन परेट ऊरकुन वाईच्या दिशेने जात असताना या भिषण अपघातातील मयत आणी जखमी महामार्गावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पहाताच त्यांनी स्वताची गाडी थांबवली ‌व अपघात स्थळाची पाहणी करून भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना घडल्या अपघाताची माहिती दिली.

या गंभीर अपघाताची माहिती सपोनी रमेश गर्जे यांना समजताच पिएसआय शिंदे हवालदार शिवाजी तोडरमल . दगडे .भोसले .या सहकार्याना सोबत घेऊन घटना स्थळावर दाखल होऊन तात्काळ रुग्ण वाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले  आहे .याचा पुढील तपास सपोनी रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करित आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !