जळोली गावातील गांजा साठवणुकदार यांच्यावर करकंब पोलीसांची कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
शनिवार दिनांक दि.०८ मार्च २०२५ रोजी गोपनिय बातमीदारामार्फत पोलीस हवालदार आर आर जाधव व पोलीस हवालदार संदेश शिकतोडे यांना गुप्त माहीती मिळाली होती की जळोली, ता. पंढरपूर या गावच्या शिवारातील राजेंद्र रामराव नरसाळे, रा. जळोली ता. पंढरपूर यांनी गांजाचा बेकायदेशीर साठा केलेला आहे. त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर यांनी डॉ.अर्जुन भोसले (उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग) यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी (नेमणुक श्री विठठ्ठल मंदीर सुरक्षा शाखा पंढरपुर) यांचेसोबत पोलीस पथकाने सकाळी छापा टाकुन कारवाई केली असता खालील नमुद मुददेमाल आरोपीकडे मिळुन आलेला आहे.
एकुण ५,६५,६४०/. रू किंमतीचा २८.२८२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा वनस्पतीचे पाने, फुले, बोंडे असा मुद्देमाल आरोपी राजेंद्र रामराव नरसाळे याच्या राहत्या घरी मिळुन आलेला आहे. या प्रकरणी आरोपी राजेंद्र रामराव नरसाळे रा. जळोली यांचेवर गुंगीचे औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (क) प्रमाणे सरकारतर्फे पोलीस हवालदार आर आर जाधव यांनी तक्रार देवुन गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली असुन या गुन्हयाचा तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग डॉ. अर्जुन भोसले व सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर आर जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस हवालदार राजकर, घोळवे, भोसले, शिकतोडे, सावंत, ननवरे, चालक गात, ननवरे, शिंदे यांनी केलेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा