जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर शहर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन व जिर्णोद्वाराचे काम शासन निधीतून पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. सदर कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याबाबत टिसीएस कंपनीच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता भक्तनिवास येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये गाभा-यातील दगडी कामास कोटींग करणे व इतर अनुषंगीक कामासाठी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शन वेळेत बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस अधिक्षक, मंदिर समिती, सल्लागार परिषद, महाराज मंडळी व स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. सदर बैठकीत चर्चा होवून निर्णय घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शन वेळेत कोणत्याही बदल करण्यात आलेला नाही, याची वारकरी भाविकांनी नोंद घ्यावी असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा