maharashtra day, workers day, shivshahi news,

महाराष्ट्राला स्त्री नेतृत्वाची मोठी पंरपरा - जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे प्रतिपादन

आतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कृतीला आणखी गती देऊया उपक्रम

International Women's Day, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाराष्ट्राला स्त्री नेतृत्वाची मोठी पंरपरा आहे. या परंपरेमुळे आज स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणे काम करीत करीत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

आतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महसूल प्रशासनामार्फत कृतीला आणखी गती देऊया या कार्यक्रमास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, लेखीका विद्या पोळ यांच्यासह महसूल प्रशासनातील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना घडविले, असे सांगून जिल्हाधिकारी  पाटील म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्त्री शिक्षणाची दारे खुली झाली. आज प्रत्येक क्षेत्रात तसेच विविध परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकावर मुलीच आहेत. 

परिस्थितीला खंबीरपणे समोरे जाण्याची व त्यातून मार्ग काढण्याचा स्त्रीयांमध्ये नैसर्गिक गुण आहे. या गुणांमुळेच स्त्रीया कोणत्याही मोठ्या संकाटातून सहजरित्या बाहेर येवून चांगले जीवन जगू शकतात.  प्रशासनात कामकरीत असताना विविध संकटे, दबाव अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यातूनही प्रशासनातील महिला अधिकारी, कर्मचारी उत्तम पद्धतीने काम करित असल्याचेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या कार्यक्रमा प्रसंगी सांगितले. 

प्रशासनातील महिला अधिकारी, कर्मचारी कौटुंबीक जबाबदारी पार पाडत सकारात्मक दृष्टीने काम करीत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीने काम करतील असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, उस्फुर्त कला सादरीकरण, मनोरंजन कार्यक्रम, स्त्री सक्षमीकरणाच्या नव्या जाणीवा या विषयावर व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !