बदनामीच्या षड्यंत्रामागे नक्की कोण आहेत याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपुर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामविकासमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्यावर मागील काही दिवसापासून जाणून बुजून चिखलफेक करत असून, बदनामी करण्याचे काम करत आहे. त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी.
नामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत या बाबत स्पष्टीकरण दिलेले असून २०१६ मध्ये सदर महिला ही जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेल करत होती आणि तिने त्यांच्या विरूद्ध कोर्टामध्ये केस सुद्धा केली होती, परंतु कोर्टाने जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केलेली असतानाही जवळजवळ दहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे प्रयत्न चालविले आहेत.
नुकतेच सदर महिलेने माध्यमाशी बोलताना आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदने दिल्याचे सांगितले,परंतु हि बाब खोटी असून मंत्री महोदयांच्या बरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा या महिलेने बदनामीचे काम सुरू केले आहे.एकूणच सदर महिला हेतुपूर्वक नामदार जयकुमार गोरे यांची बदनामी करीत असून या मागे मोठे षडयंत्र असल्याचेच दिसून येत आहेत.सदर ब्लॅकमेल प्रकरणामागे आणखी कोण आहेत याचा शोध घेऊन कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आज भाजप महिला आघाडीकडून पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देत करण्यात आली.
यावेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेणारे,शहराध्यक्षा ज्योती शेटे,विश्रांती भुसनर,प्रतिभा गानमोटे यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या विविध पदाधीकारी व कार्यकर्त्या तसेच भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर,युवा नेते प्रशांत देशमुख, बाळासाहेब माळी ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप माने,बादल सिंह ठाकुर ,हरिभाऊ गावंदरे,वैभव लिंगे,अमोल डोके,कृष्णा नवटाके, ,नागनाथ फुले,दिनकर गवळी,नानासो गवळी,यदाजी मोरे,बाबासो खटकाळे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा