देशमुख कुटुंबाची भेट घेवुन रूपये एक लाख अकरा हजार केली सुपूर्द
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
बीड जिल्ह्य़ातील मस्साजोग येथिल सरपंच संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण संपुर्ण राज्यभरातच नव्हे तर देशात गाजले. दिवंगत संतोष देशमुख यांचे मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे,आंदोलने व बंद या घटना घडल्या. गुन्हेगारांना अटक झालेली आहे,एक गुन्हेगार अध्यापही फरार आहे. दरम्यान दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाबाबत सहानुभूती म्हणुन राज्यभरातील अनेक गावांमधील लोकांनी आतापर्यंत मदतीचा हात दिला आहे.
संतोष देशमुख यांचे कार्य हे समाज व सर्वाभिमुख असे होते,त्यांनी राजकारणातून कधीही स्वार्थ व संपत्तीचा लोभ केला नाही अशी त्यांच्या मृत्यूनंतर जनभावना निर्माण झाली आहे. याच भावनेतून गादेगाव ता.पंढरपूर येथिल ग्रामस्थांकडून मागील दोन दिवसांत या देशमुख कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करण्यात आली होती.
आज मस्साजोग येथे जावुन गादेगावातील तरूणांनी मिळुन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व कुटुंबातील सदस्यांची भेट घेवुन त्यांच्याकडे रक्कम रूपये एक लाख अकरा हजार रू. ही मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी स्व.संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत इथुन पुढच्या काळात देखील आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोवर या कुटुंबासोबत खंबीर पणे उभे आहोत असा निर्धार देखील यावेळी गादेगाव ग्रामस्थांनी व्यक्त केला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा