सुमारे 1 लाख 23 हजार इतकी आहे किंमत
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस पंढरपूर येथील दानशुर भाविकाने सुमारे 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
संबंधित भाविक हे श्री क्षेत्र पंढरपूर येथील रहिवाशी असून, त्यांनी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी नाव न जाहिर करण्याच्या अटीवर 16 ग्रॅम वजनाची चेन श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केली आहे. त्याची अंदाजे 1 लाख 23 हजार इतकी किंमत होत आहे.
मंदिर समितीने सोने चांदीच्या भेट वस्तू स्विकारण्यासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती केली असून, त्यासाठी विभाग प्रमुख, 1 लिपीक संवर्गातील कर्मचारी व 2 सराफ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. भाविकांना संगणकीकृत पावती देण्यात येते. ज्या भाविकांना सोने चांदीच्या वस्तू अर्पण करावयाच्या आहेत, त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी श्री श्रोत्री यांनी केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा