व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर सुरू केला कॅफे रेस्टॉरंट
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
पंगा क्वीन म्हणून परिचित असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडीच्या भाजप खासदार कंगना राणावत यांनी शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाईन डे' च्या मुहूर्तावर कॅफे सुरू केला आहे. ओपनिंग आधी कंगनाने कार्तिक स्वामी मंदिरात विशेष पूजाही केली. कंगनाने मनालीमध्ये 'द माऊंटन स्टोरी' नावाचे हे कॅफे आणि रेस्टॉरंट उघडले आहे. कंगनाचे वडील अमरदीप राणावत आणि आई आशा राणावत हे देखील तिच्या कॅफेच्या उद्घाटनाला उपस्थित होते.
अभिनय, दिग्दर्शन आणि राजकारणानंतर कंगना आता या कॅफेद्वारे व्यवसायाच्या जगात प्रवेश करत आहे. कंगनाने मनालीच्या प्रिनी येथे डोंगराळ शैलीत हे कॅफे बांधले आहे. बसण्याच्या जागेच्या बाहेरून आतपर्यंत पर्वताचे दृश्य दिसते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा