भुमिका कशी मिळाली याबाबत लिहिली भली मोठी पोस्ट
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
चित्रपट रसिकांना प्रतीक्षा असलेला आणि प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता निर्माण झालेला छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदाना हिने महाराणी येसुबाईंची भूमिका केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक उलट सुलट चर्चा या चित्रपटाविषयी झाल्या होत्या, मात्र शुक्रवारी, दि. १४ फेब्रुवारी रोजी छावा चित्रपट सिनेमागृहात रीलिज झाला आहे.
यामध्ये विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, तर रश्मिका मंदाना महाराणी' राणी येसुबाई यांच्या भूमिकेत आहे. चित्रपट रीलिज होताच रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर शूटिंगचे काही फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय, तिला ही भूमिका कशी मिळाली, याबद्दल तिने मोठी पोस्ट लिहून माहिती दिलीय. मी एका वक्त्यापेक्षा चांगली लेखिका आहे म्हणून इथे लिहितेय - मी मिमी नावाचा चित्रपट पाहिला होता आणि मला हा चित्रपट इतका आवडला की, मला माझ्या चित्रपटाच्या 'गुडबाय'च्या प्रदर्शनासाठी लक्ष्मण सरांना बोलवायचे होते आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला आणि प्रवास सुरू झाला. तेव्हा सरांनी लगेच मला विचारले की, तुला कॉल करू शकतो का आणि आम्ही बोललो आणि ते मला त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी मला भेटायचे आहेत, असे सांगत होते.
मला वाटले की, ते खूप आनंदी झाले. याबद्दल मी मनापासून आभार मानते. कथा काय आहे हे मला माहीत नव्हती. ते माझ्याकडे का आले हे मला माहीत नाही, त्यांनी मला महाराणी म्हणून कसे पाहिले हे मला माहीत नाही. काय घडत आहे हे मला कळतही नव्हते. जेव्हा मी खर तर वर्णन ऐकले तेव्हा मी गोंधळले, धक्का बसला; पण इतकं कृतज्ञ, भारावून गेले आणि इतका आनंद झाला की, मला कशी प्रतिक्रिया द्यावी हे माहीत नव्हते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा