पुरस्कार वितरण, शिदोरी स्नेहभोजनसह परिसंवाद, व कवितांचा आस्वाद
शिवशाही वृत्तसेवा, आटपाडी
दुसऱ्या सत्रात कथाकार सुनील दबडे यांच्या 'बनगी आणि बिरमुटं' ह्या कथासंग्रहावरती परिसंवाद संपन्न झाला. त्याचे अध्यक्षपद डॉ.सयाजीराजे मोकाशी यांनी भूषविले तर श्रीकृष्ण पडळकर व डाॕ. दिनेश देशमुख यांनी संग्रहावरती भाष्य केले. विट्याचे जेष्ठ साहित्यीक रघुराज मेटकरी यांनी मार्गदर्शनपर आभार मानले. तसेच कृष्णकांत कुलकर्णी लिखित, माडगूळ परिसरातच फुलत जाणारी कथा आणि पारधी समाज जीवनावर आधारित असणारी घात या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिदोरी भोजनानंतर तिसऱ्या सत्रामध्ये जेष्ठ कवी सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन उत्साहात पार पडले. यामध्ये जवळपास पस्तीस कवींनी आपला सहभाग नोंदवला व अनेकानेक उत्तम कविता सादर झाल्या. यामध्ये दत्तप्रसाद जोग, चैतन्य कुलकर्णी, मंदार खरे, ज्ञानेश डोंगरे, शिवाजी बंडगर, सुनिल जवंजाळ, लक्ष्मण हेंबाडे, सुजीतकुमार कांबळे, वैभव कुलकर्णी, पुष्पाताई मिसाळ, मेघा पाटील, अनिता पाटील, रमेश जावीर, अरूण बनपुरीकर, तानाजी वाघमारे, सचिन कुलकर्णी, जयंत बोबडे, संभाजी अडगळे, सुशिला नांगरे, विद्या शिर्के, मनिषा ठोंबरे, जान्हवी सावंत, कृष्णा पाटील, संतोष रायबाण, विठ्ठल पंडीत, अनिल पाटील, व्ही.एन.देशमुख, गिरीधर इंगोले, आणि सुधाकर इनामदार इत्यादी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाला महादेव मंडले यांनी मोलाचे सहकार्य केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा