maharashtra day, workers day, shivshahi news,

वाईतील धोम डाव्या कालव्यातील पाण्यात १२ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडुन मृत्यू - तर दुसरा सध्या बेपत्ता

वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांची घटना स्थळाला भेट 

12-year-old school boy drowns, second missing, bhuinj, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि रमेश गर्जे यांनी दिलेली माहिती अशी की वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा हा खानापुर गावा शेजारून जातो या कालव्यातून वाहत असलेले पाणी पाहण्यासाठी याच गावातील अथर्व गोक्षख माने वय १२ वर्ष आणी अर्णव अमोल माने वय १० वर्ष असे दोघेजण गेले होते . पायातील चपला काढून या दोघांनी. कालव्याच्या कडेला ठेवून पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतानाच अथर्व हा पाय घसरून पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. तर दुसरा अर्णव हा घाबरून पळून गेला की पाण्यात बुडाला याचा सध्या तरी अंदाज पोलिसांना लागत नसल्याने त्याची भुईंज पोलिस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली आहे.

हि घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना समजताच त्यांनी या विभागाचे बिट अंमलदार सहाय्यक फौजदार वैभव टकले यांना सोबत घेऊन घटना स्थळावर पोहचुन ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली असता घटना स्थळा पासुन अवघ्या १०० मिटर अंतरावर अथर्वचा मृतदेह सापडला.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !