मालवाहुतक बोलरो पिकअप सह १९.२०,००० रू किमतीचा गुटखा व तंबाखुजन्य मुददेमाल ताब्यात
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत, एक पांढऱ्या बदामी रंगाच्या मालवाहतुक पिकअपमध्ये प्रतिबंधीत व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा सांगोल्याचे दिशेने पंढरपुर मार्गे टेंभुर्णीकडे जात असल्याची गोपनीय बातमी मिळालेने पंढरपुर शहर गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणे हददीतील सांगोला रोडवरील विक्रम ढाबा समोर सापळा लावला. रात्री ०९:३० वाजण्याच्या सुमारास बातमीतील वर्णनाचा मालवाहतुक पिकअप हा विक्रम ढाब्यासमोर रोडवर आला असता तो गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी थांबवुन पिकअप चालकाकडे पिकअप मधील मालाबाबत विचारणा केली असता पिकअप चालकाने गाडीमध्ये प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला, आर.एम.डी पानमसाला व सुगंधित तंबाखु असल्याचे सांगीतले.
जप्त करण्यात आलेल्या पिकअप व प्रतिबंधीत केलेला गुटखा एकुण मुद्देमाल१) ६,००,०००/- रू. अंदाजे किंमतीचा विमल कंपनीचा पान मसाला - २५ पोती२) १,९८,०००/- रू. अंदाने किंमतीचा किंग पॅक विमल कंपनीचा पान मसाला- ०५ पोती३) ६०,०००/- रू. अंदाजे किंमतीची एम कंपनीची सुगंधित तंबाखु - १०० बॉक्स४) ९०,०००/- रू. अंदाजे किंमतीचा आर. एम. डी कंपनीचा पान मसाला -१०० बॉक्स५) १,५०,०००/- रू. अंदाजे किंमतीची व्ही १ कंपनीची सुगंधित तंबाखु :- ०५ पोती६) २२,०००/- रू. अंदाजे किंमतीची व्ही १ कंपनीची सुगंधित तंबाखु :- ०१ पोते३) ८,००,०००/- रू किं एक महिंद्रा कंपनीचा बोलेरा पिकअप नं एम. एच-१० डीटी ४५१७एकुण १९,२०,०००/- किंमतीचा मुददेमाल चालकासह ताब्यात घेतला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा