तहसीलदार अजित दिवटे यांच्या प्रयत्नांना यश
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची अतिशय महत्वकांक्षी योजना असलेल्या ॲग्रिस्टेंक फार्मर आयडीत सिंदखेडराजा तालुका जिल्ह्यात क्रमांक दोनवर असून, सर्वाधिक २० हजार फार्मर आयडी कातून झाल्या आहेत. सिंदखेडराजा चे कर्तव्यदक्ष तहसीलदार अजित दिवटे यांनी पहिल्या दिवसांपासून कॅम्प घेऊन व जनजागृती करून शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेंक फार्मर आयडीचे महत्व पटवून दिले होते. तसेच, प्रशासकीय यंत्रणादेखील चोखपणे राबवणे सरू आहे.
शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे असे आवाहन तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी काढण्यात मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, सर्वाधिक कमी नांदुरा तालुक्यात ९,२५२ इतक्याच निघाल्या असून, नांदुरा, शेगाव, मोताळा तालुक्यांत ही मोहिम फारच धीम्या गतीने राबविली जात असल्याचे दिसून येत आहे. तर, चिखली तालुक्यात तहसीलदार संतोष काकडे प्रथम क्रम कि वर, मेहकर तालुक्यात तहसीलदार नीलेश मडके यांच्या पुढाकाराने १८ हजार ३९५ शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी काढण्यात आल्या असून, सदर तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अॅग्रिस्टॅक फार्मर आयडीसाठी जवळपास दोन लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी लवकरच येणारआहेत.
बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुका क्रमांक दोनवर येण्यासाठी तहसीलदार अजित दिवटे यांच्या कुशल नेतृत्वात सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, तलाठी व महसूल कर्मचारी यांच्यासह सीएससी सेंटर, ग्राम महसूल कर्मचारी व सेंटर यांनी अथक परिश्रम घेत आहेत, त्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपली ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार अजित दिवटे यांनी केलेले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा