विविध गावांमध्ये सुरू असलेल्या संपर्क दौऱ्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा , वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
ओझर्डे पंचायत समिती गण हा मकरंद पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी, यावेळी या गणात राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार कु. हर्षदा सुधीर फरांदे यांना महिला वर्गातून मोठा आणि उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे लढतीला चुरशीचे स्वरूप आले आहे.
कु. हर्षदा फरांदे या गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, शेतकरी महिला, कष्टकरी कामगार, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्या सातत्याने अग्रेसर राहत आल्या आहेत. महिलांचे प्रश्न, बचतगटांचे सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती, पाणी व आरोग्य यांसारख्या मूलभूत विषयांवर त्यांनी प्रभावी भूमिका मांडली आहे.
ओझर्डे गणातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या संपर्क दौऱ्यात त्यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, घराघरांतून पाठिंब्याचा सूर उमटत आहे. महिलांच्या विश्वासामुळे आणि थेट संवादाच्या पद्धतीमुळे कु. फरांदे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
शेतकरी, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या असून, विकासाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ओझर्डे पंचायत समिती गणात चुरशीची आणि लक्षवेधी लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



