विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, बूलढाणा ( प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे )
जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, दुसरबीड येथे आज वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्नेहसंमेलन दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवस साजरे करण्यात येणार आहे.
स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दिपक मांटे (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नागपूर), जगनजी मुंढे साहेब (उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक, जि. प. बुलढाणा) तसेच जीवनराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मुकुंदराव देशमुख (अध्यक्ष, लोकशिक्षण संस्था, किनगाव राजा), गणेशराव राजे जाधव (सचिव, लोकशिक्षण संस्था, किनगाव राजा), शिवाजीराव खरात यांची उपस्थिती होती. यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पालक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
तसेच प्राचार्य भांगे सर, उपप्राचार्य धन्नावत सर, पर्यवेक्षक वायाळ सर, स्नेहसंमेलन प्रमुख जी. ओ. देशमुख, सांस्कृतिक प्रमुख डी. जी. राजे जाधव शारीरिक शिक्षक गजेंद्र देशमुख यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



