गड किल्ल्यांचे जतन, संवर्धन व संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव होऊन युवक सक्रीय व्हावेत
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
गड किल्ल्यांचे जतन, संवर्धन व संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव व्हावी व युवक सक्रीय व्हावेत या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या गड किल्ले संवर्धन सेलच्या वाई तालुका अध्यक्षपदी अक्षय शिंदे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गड किल्ले संवर्धन सेल च्या वाई तालुका अध्यक्ष पदी अक्षय शिंदे यांची निवड करण्यात आली. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्य जोमाने काम करतील व पक्ष बळकट करण्यासाठी निश्चित सहकार्य करतील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी व्यक्त केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी समीर धुमाळ, मनोजकुमार भोसले, अविनाश जाधव, शंकर चिकणे, डॉ. अजय खुटवड, वल्लभ कोकाटे, अमित नागपूरे, विक्रम भिलारे, युवराज मुजुमले, जनार्दन घोडे, अमित नागपूरे, धनंजय पासलकर, विनायक धोत्रे, योगेश कोळपकर, दीपक घोरपडे, राजू पांचाळ, सुधीर फडके, नंदकुमार दोडके, अतुल कोरडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा