पद्मश्री शिर्के यांच्या परंपरेतून प्रेरणा घेऊन गावाचा गौरव वाढवणारी घटना
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पसरणी गावचे सुपुत्र आणि जागतिक पातळीवर पॅराग्लाइडिंगच्या कौशल्याने ओळखले जाणारे गोविंद येवले यांनी आज काळभैरवनाथ मंदिराच्या आकाशात अभूतपूर्व कर्तबगारी सादर केली. पॅरामोटरच्या साह्याने मंदिरावर ग्लायडिंग करत असताना त्यांनी गुलाल आणि पुष्पांची वर्षाव केला. ज्यामुळे भाविकांच्या मनात भक्तिभावाचा संचार झाला. यामुळे पद्मश्री बी.जी. शिर्के यांनी दरवर्षी हेलिकॉप्टरमधून केलेल्या पुष्पवृष्टी आणि गुलाल उधळणीची आठवण ग्रामस्थांना झाली.
दरवर्षी हेलिकॉप्टरमधून काळभैरवनाथ मंदिरावर पुष्पवृष्टी करणाऱ्या पद्मश्री बी.जी. शिर्के यांच्या प्रेरणेतून ही कल्पना साकारली, असे गोविंद यांनी सांगितले. "शिर्के साहेबांच्या सेवेने माझ्या मनातील भावना अधिक बलवान केल्या," असे ते भावुक होऊन म्हणाले.
"गोविंद यांनी केवळ एडव्हेंचरच नव्हे, तर भक्ती आणि परंपरा यांचा मिलाफ आज दाखवून दिला. पसरणीचा हा मुलगा आमच्या गावाचा गौरव आहे," असे पत्रकार आणि देवस्थान ट्रस्टचे सहसचिव अमोल महांगडे यांनी म्हटले. ग्रामस्थांनीही गोविंदच्या साहसी कृत्याचा गौरव करत शुभेच्छा व्यक्त केल्या.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा