फोटोग्राफीतील अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान, एडिटिंग व इतर विषयावर मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन पंढरपूर यांच्या वतीने दिनांक 27 फेब्रुवारी रोजी फोटोग्राफी काल आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
बालाजी नवले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या शिबिरात नाशिक येथील प्रसिद्ध फोटोग्राफर पंडित मुद्गुल हे मार्गदर्शन करणार आहेत. राजा डिजिटल एक्सप्रेसचे सम्राट भांडवलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आधुनिक काळात फोटोग्राफीचे तंत्रज्ञान सातत्याने अद्ययावत होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय सारखे तंत्रज्ञान फोटोग्राफी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणत आहे त्यातील आव्हाने आणि संधी याचे ज्ञान आजच्या फोटोग्राफर बंधू-भगिनींना असावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यशाळेमध्ये फोटोग्राफीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान एडिटिंग तंत्रज्ञान व इतर अनेक बाबींवर पंडित मुद्गुल मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम फोटोग्राफर व्हिडिओग्राफर बंधूंसाठी पूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त फोटोग्राफर बंधूंनी कार्यशाळेला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पंढरपूर फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनचे नूतन अध्यक्ष गणेश रोकडे यांनी केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा