वाईच्या गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथील सोनगीरवाडी येथे दारू पीत बसलेल्यांन मध्ये मस्करी करत असतानाच झालेल्या वादावादीतून एकाला अमानुषपणे मारहाण करत खून केल्याची घटना घडली याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात वाई पोलिसांना यश आले असून या प्रकाराने वाई परिसरात खळबळ माजली आहे.
वाई शहरांतील सोनगिरीवाडी येथील बाभळवनात राज अरुणकुमार सिंग, आणि त्याचे मित्र प्रणित गायकवाड,वय २५ शाकीर खान वय २५असे तिघेजण हे दारू पिण्यासाठी बसले होते. याचवेळी शाकीर राज, व प्रणित यांच्यात चेष्टामस्करीतून वाद सुरु झाला. हा वाद बघता बघता विकोपाला गेला आणि त्या रागाच्या भरात प्रणित याने राज याच्या डोक्यात बिअरच्या दोन बॉटल फोडल्या तसेच शाकीर व प्रणित यांनी मिळून बांबूने राज याला जबर मारहाण केली. विनोद याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राज हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्यानंतर प्रणित व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धुम ठोकली.
घडलेला प्रकार विनोद याने राजचा भाऊ अश्विनी सिंग याला फोन करून सांगितला. त्यांनतर अश्विनी याने घटनास्थळावर जाऊन राज याला अॅम्बुलन्स मधून वाईच्या ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता तेथील उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण चेष्टामस्करीतून वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यातच रागाच्या भरात प्रणित याने राज याच्या डोक्यात बिअरच्या दोन बॉटल फोडल्या तसेच शाकीर व प्रणित यांनी मिळून बांबूने राज याला जबर मारहाण केली. विनोद याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राज रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्यानंतर प्रणित व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धुम ठोकली. घडलेला प्रकार विनोद याने राजचा भाऊ अश्विनी सिंग याला फोन करून सांगितला. त्यांनतर अश्विनी याने घटनास्थळावर जाऊन राज याला अॅम्बुलन्स मधून ग्रामीण रुग्णालय वाई येथे नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले .
याप्रकरणी प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण करत त्याचा खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विनी अरूण कुमार सिंग या महिलेने वाई पोलीस ठाण्यात रात्री २ वाजण्याच्या सुमारास दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारे परिविक्षाधीन डिवाय एसपी श्याम पानेगावकर आणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी रात्री २ वाजण्याच्या सुमारास वाईचे डिबी प्रमुख असलेले सुधीर वाळुंज हवलदार मदन वरखडे प्रसाद दुदुस्कर श्रावण राठोड हेमंत शिंदे विशाल शिंदे धिरज नेवसे विशाल येवले राम कोळी नितीन कदम रुपेश जाधव गौतम दाभाडे या डिबीच्या पथकाला बोलावून आरोपी पकडण्यासाठी सखोल मार्गदर्शन करून वाई शहरातुन बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यां वर सापळे लावण्याचे आदेश दिले.
वरिष्ठांच्या या सुचनेनुसार या पथकांनी मांढरदेव घाट परखंदी घाट अशा ठिकाणचे डोंगररांगा रात्रभर पिंजुन काढल्या पण आरोपी काही हाताला लागत नव्हता पहाटे ऊजडत असताना घाटात फिरायला येणाऱ्या लोकांना सुधीर वाळुंज यांनी आरोपींचे फोटो दाखवले असता ते परखंदी घाटाने गेले असल्याचे समजले अखेर या टिमने डोंगररांगान मध्ये लपुन बसलेल्या आरोपींना अथक परिश्रम घेवून दोन्ही आऱपींच्या मुसक्या आवळून त्यांना अवघ्या चार तासातच गजाआड केल्याने वाई तालुक्यातील नागरिकांनसह जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी वाईच्या डिबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
या गंभीर गुन्ह्याचा अधिक तपास वाई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अमोल गवळी हे करत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा