वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळदीची आवक सुरू
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड वर नवीन हळदीची एक हजार पोत्यांची आवक झाली.
किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांचे हस्ते हळद लिलावांचा शुभारंभ झाला. हळदीचा दर प्रति क्विंटलला रू.१३०००/- ते रू.१६१००/- निघाला आहे. मिठालाल लख्मीचंद जैन यांचे काट्यावर शेतकरी श्री. दत्तात्रय डेरे यांना रू.१६१००/-, कांतीलाल भुरमल यांचे काटयावर शेतकरी श्री. अनिल कचरे यांना रू.१६०००/-, तसेच पारसमल मदनलाल यांचे काटयावर शेतकरी श्री. संतोष इथापे यांना रू.१६०००/- तसेच शेतकरी श्री. नितीन करपे यांना साहेबराव शेलार यांच्या काटयावर रू.१६०००/- एवढा दर मिळालेला आहे.
हळद लिलाव शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रतापराव पवार, बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, उपसभापती विनायक येवले, संचालक रमेश गायकवाड, केशव गाढवे, तानाजी कचरे, राहुल डेरे, पोपट जगताप, रविंद्र मांढरे, शकुंतला सावंत, राहुल वळकुंदे, विवेक भोसले, संजय मोहोळकर, दत्तात्रय बांदल, अशोक सोनावणे, तुकाराम जेधे, नानासो शिंदे, सचिन फरांदे बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कदम, राजेंद्र सोनावणे, विक्रमसिंह पिसाळ, उपस्थित होते. खरेदी विकी संघाचे चेअरमन मदन भोसले, व्यापारी कांतीलाल भुरमल, दिपचंद शेठ, ओसवाल, मदन ओसवाल, हेमंत जैन, मिठालाल जैन, शंकर शेठ, मदनलाल ओसवाल, प्रविण ओसवाल, रविंद्र कोरडे, साहेबराव शेलार, विनोद पावशे, विश्वास हगवणे, प्रविण ओसवाल, विनोद भुरमल, महेश फरांदे, आणि तालुक्यातील हळद उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
बाजार समितीचे सभापती मोहन जाधव यांनी आपल्या भाषणात हळद लिलाव दर सोमवारी व दर शुक्रवारी काढावेत. शेतक-यांच्या हळद या शेतमालास जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करावा. तसेच शेतक-यांनी ही आपण आपला हळद हा शेतमाल स्वच्छ करून वाई मार्केटवर आणावा. परस्पर बाहेर व्यापा-यांना घातलेस वजनात व पेमेंट मध्ये फसवणुक होणेची शक्यता आहे. त्यामुळे वाई मार्केटवरच हळद विक्रीसाठी आणावी असे आवाहन केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा