सहा जणांवर केला हल्ला, पैकी दोघे गंभीर जखमी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील पांडव गडावर इंदापूर तालुक्यातील सहा जणांवर हजारो मधमाशांनी आज सकाळी सात वाजता भीषण हल्ला करून चावा घेतल्याने आल्हाद दंडवते, निखिल क्षिरसागर, गोपाळ आवटी, गोपाळ दंडवते, संतोष जपे, चैतन्य देवळे, इतर दोन बेशुद्ध अवस्थेत आहेत.
याची माहिती वाई पोलिस आणि वाई पंचायत समिती मध्ये असणारे वाई तालुका वैद्यकीय कक्षाला समजताच पाच रुग्ण वाहिकांसह वाई पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीनिवास बिराजदार डि.बी.चे विभागाचे नितीन कदम कवठे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दिलिप भोजने, नरेंद्र सणस, सि.बी.जाधव, अजीत चव्हाण, गिता वाठारकर या वैद्यकीय टीमने तातडीने पाच किमी. डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले. आणि जखमींचा शोध घेवून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करून तब्बल पाच किलो मीटर पाऊल वाटेने खाली आणण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून वाईच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा