अनाथ आश्रमातील मुलं आणि वृद्धाश्रमातील वृध्द मातापित्यांना फळे व मिष्ठान्न भोजन
वाढदिवसाच्या औचित्य साधून शिवसेना व युवासेनेच्या वतीने महेशनाना साठे, प्रीयंका परांडे, अनिता माळगे, गणेश जाधव, महादेव भोसले यांच्याकडून कॉमन मॅन आणि अनाथांना आधार देण्याचे काम करण्यात आले.
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जाणारे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब सामान्य नागरिकांमध्ये मिसळून समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले होते.
या अनुषंगाने पंढरपुरात कॉमन मॅन म्हणून ओळखले जाणारे वयोवृद्ध नागरिक, अनाथ बालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जाऊन वाढदिवसाच्या औचित्य साधून शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे शिवसेना व युवासेना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून पक्षाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात आले.
यामध्ये पंढरपूर नजीक असलेल्या पालवी येथील विद्यार्थ्यांना फळे व मिष्ठांन भोजन देण्यात आले तसेच पंढरपुरातील राम,कृष्ण,हरी वृद्धाश्रम व गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना मिष्ठांन भोजन देण्यात आले.
यावेळी सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, महिला आघाडी संपर्कप्रमुख अनिता माळगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रियंका परांडे, लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय साठे, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जाधव, रणजीत जगताप, युवा सेना तालुकाप्रमुख महादेव भोसले, युवती सेना शहर प्रमुख पल्लवी जन्मले, ग्रामपंचायत सदस्य नागराबाई साठे, रेश्मा साठे, रोहिणी साठे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, अमोल भोसले, रंजीत पवार, कृष्णा साठे, सुनिता जाधव, पवार मॅडम, उषा घाडगे, लखन बोंडवे, बापू उकिर्डे योगेश गायकवाड ,समाधान कुरुंद,,आनिल घोडके ,आमोल लेंडवे,विश्वास वसेकर ,समीर मुजावर उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा