वडगाव गुंड येथील प्राजक्ता तांबेची महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धा परीक्षेत वडगाव गुंड येथील प्राजक्ता हिराभाऊ तांबे हिची महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली आहे.
प्राजक्ता तांबे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून तिचे वडील अपंग आहेत . त्यामुळे तिने प्रचंड मेहनत करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर महसूल सहाय्यक अधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेत तिने हे यश मिळवले. तिचे आई-वडील दुसऱ्याच्या मोल मजुरी करून प्राजक्ताला शिकवत आहे . प्राजक्ता नेही आई-वडिलांना हातभार लावून जिद्दीने शिक्षण पूर्ण केले .
हे यश मिळवून ती थांबणार नसून पुढील स्पर्धा परीक्षा देऊन उच्च पदावर जाण्याची तिची इच्छा आहे. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना तिने प्रचंड जिद्द , प्रबळ आत्मविश्वास , प्रचंड कष्टाच्या जोरावर हे सुयश मिळवले . शेतकरी कुटुंबातील असलेल्या या तरुणीने अत्यंत खडतर परिस्थितीतून या यशाला गवसणी घातली असून तिच्या या यशाचे ज्ञानोदय कोचिंग क्लासेस व किलबिल बाल विकास मंदिर चे संचालक प्रा. राजेश खणकर व छाया पठारे आणि वडगाव गुंड , निघोज ग्रामस्थांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे . तिच्या या यशाचे इतरांनी अनुकरण करून असे यश मिळवावे ,अशी अपेक्षाही प्रा राजेश खणकर यांनी व्यक्त केली आहे .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा