मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रेनिमित्त जनसभा संपंन्न
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
20 फेब्रुवारी 2025 रोजी येथील ऐतिहासिक संविधान चौकात मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा निमित्त जनसभेचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे होते तर या सभेचे उद्घाटन माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ही इंपाचे डॉ. मगन ससाने ,प्रोटान चे गोरक्षनाथ वेताळ यांनी मार्गदर्शन केले.
बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य महासचिव फिरोज भाई सय्यद, ॲड. शिरीष लोळगे, डॉ. बेंद्रे, माजी नगरसेवक संजय देशमुख, मायाताई गायकवाड, मुजफ्फर कुरेशी, अबिद शेख, उद्योजक किरण पठारे, अर्षद शेख, अशोक गुळादे, सागर घोलप इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सभेसाठी आलेल्या सर्व समाजासाठी प्रवीण शिशुपाल फाउंडेशन च्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली होती.
यावेळी वामन मेश्राम म्हणाले की, बहुजन समाजाला एकत्र करून त्यांच्या न्याय अधिकारासाठी संघटित होण्याच्या आवाहन केले व ईव्हीएम च्या विरोधात एकजूट होऊन संघर्ष करावा लागेल त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जेलभरो व भारत बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी तन-मन धनाने प्रयत्न करावे असेही आवाहन केले व प्रेरणादायी विचार मांडताना विशेषता: "चलो गाव की ओर ,चलो बुथ की ओर" या घोषवाक्याला सर्व समाज बांधवांनी एकजूट होऊन प्रोत्साहन द्यावे असेही सांगितले
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा