दोन चोरटे मोटरसायकलवरून झाले फरार
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथील विजय सखाराम हरकळ या शेतकऱ्याच्या घरी भर दिवसा दुपारी ३ वाजून चाळीस मिनीटांच्या सुमारास २ अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ४० हजारांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची घटना घडली असून. चोरी करून चोरटे मोटरसायकलवरून फरार झाले आहे. फिर्यादी असलेल्या विजय हरकळ यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ११ फेब्रुवारी रोजी किनगावराजा ते सिंदखेडराजा महामार्गावर असलेल्या विजय हरकळ यांच्या घरात दुपारी ३ वाजेपर्यन्त वडील सखाराम हरकळ घरात होते.
त्याानंतर ते घराला कुलूप लावून शेतामध्ये कामाला निघून गेले व विजय हरकल कामानिमित्त सिंदखेडराजा येथे गेलो असता त्यांची मोठी मुलगी श्वेता ही दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान सिंदखेडराजा येथून कॉलेजहुन घरी आली असता दरवाजा आतून लावलेला असल्याने दरवाजाची कड़ी बाजबली असता दरवाजा उघडून २ इसम तोंडाला फडके बांधून बाहेर आले व काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर बसून सिंदखेडराजाकडे फरार झाले. त्याावेळी श्वेताने आरडा ओरड केली असता जवळच राहत असलेली बहीण अनिता गणेश परमाळी धावत आली.
दरम्यान मी घरी आलो असता घरासमोर गर्दी दिसल्याने व मुलीने घटनाक्रम सांगितला असल्याने घरात जाऊन पहिले असता घरातील लोखंडी कपाट फोडलेले अढळले सदर कपाटात चार दिवसांपूर्वी कापूस विकून ठेवलेले ८० हजार रुपये, माझ्या पतीचे जुने बापरात असलेली सोन्याची २ तोळ्याची गहपोत, किंमत अंदाजे ४० हजार रुपये, कानातील ७ ग्रॅमचे झुंबर किंमत अंदाजे १४ हजार रुपये, ३ ग्रॅम वजनाची कानातील बाळी किंमत अंदाजे ६ हजार असा एकूण रोख रक्कम व दागिने असलेला १ लाख ४० हजार रुपयेचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा