नागरिक विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय टाळावी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची वाढती गैरसोय लक्षात घेता, दुसरबीड सह विविध मार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी खालील मार्गावर बससेवा सुरू करणे अत्यावश्यक असल्याने आमदार मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पत्राद्वारे प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख यांनी बुलढाणा विभाग नियंत्रक सिरसाठ मॅडम यांचेकडे मागणी केली आहे.
यामध्ये देऊळगाव मही मार्गे चिखली दुसरबीड (सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी २ फेऱ्या) पूर्वीप्रमाणे सुरू करावी. तसेच चांगेफळ येथे मुक्कामी बस सुविधा करून चांगेफळ - बुलढाणा दररोज सकाळी बस सेवा देण्यात यावी. मेहकर साखरखेर्डा- मलकापूर पांगरा, दुसरबीड- देऊळगाव राजा अशी बस सुविधा देण्यात यावी.
यासोबतच देऊळगावराजा-दुसरबीड, किनगाव जटूटू, लोणार, रिसोड, वाशिम ही बस सेवा देण्यात यावी. तसेच खामगाव - मंठा-अमडापूर - साखरखेर्डा दुसरबीड सेवली मंठा हि बसेवा सुरु करणे आवश्यक आहे. यासोबतच लोणार- शिर्डी- किनगाव जट्टू दुसर बीड-सिंदखेडराजा - नावा - जालना या मार्गांवर बस उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार व ग्रामीण भागातील लोक यांना प्रवास करताना अडचणी येत आहेत. म्हणूनच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन या मार्गांवर बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रदेश सरचिटणीस इरफनअली शेख यांचेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा