ट्रॅक्टरच्या पात्यात डोके अडकून घडला भयंकर अपघात
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ओझर्डे ता. वाई येथील राकेश अरविंद फरांदे वय (29) याचे स्वतःच्या शेतात काम करत असताना पावर टिलर मध्ये अडकून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने निधन झाले आहे. सदरचा युवक हा स्वतःच्या शेतात वाफे टाकण्याचे काम करीत होता. पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर मध्ये अंगावरील पॅन्ट आणि नंतर पाय अडकून ट्रॅक्टरची पाती अंगात व डोक्यात रुतल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले, जखमीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करणेत आले. परंतु उपचार सुरु असताना व गंभीर दुखापत झाल्यामुळे राकेश फरांदे याचे उपचारा दरम्यान गीतांजली हॉस्पिटल वाई येथे दुर्दैवी निधन झाले.
राकेश फरांदे हा शेती कामामध्ये हुशार होता व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याचे असे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे, राकेशच्या कुटुंबात आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी आहेत. रात्री सोनेश्वर स्मशानभूमी ओझर्डे येथे शोकाकुल वातावरणात याच्यावर अंत्यसंस्कार करणेत आले. गावातील तरुणाच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा