भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज दुःखद निधन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)ग्रामविकास तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
गोरे यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील बोराटवाडी येथील निवासस्थानी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी चार वाजता राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा