श्रावणी स्कॉलरशिप" या नव्या उपक्रमाची घोषणा
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
रांजणगाव, 16 फेब्रुवारी 2025 रोजी "रन फॉर हर मॅरेथॉन 2025" हा अनोखा उपक्रम राजमुद्रा चौक, रांजणगाव येथे प्रचंड उत्साहात आणि मोठ्या सहभागासह यशस्वीपणे पार पडला. ग्रामीण भागातील फिटनेस आणि आरोग्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उत्साहवर्धक सहभाग आणि प्रेरणादायी उपस्थिती
स्पर्धेची विशेष शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्राची सुवर्ण कन्या कविता राऊत उपस्थित होती. विशेष म्हणजे, Healing Lives संस्थेच्या संस्थापिका जानकी विश्वनाथन, या देखील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. "स्त्री सक्षमीकरणासाठी" सातत्याने कार्य करणाऱ्या जानकी विश्वनाथन यांनी यंदाच्या मॅरेथॉनमध्ये "श्रावणी स्कॉलरशिप" या नव्या उपक्रमाची घोषणा केली.
"श्रावणी स्कॉलरशिप" – शिक्षणासाठी एक नवी संधी
या नव्या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी २० मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना शिक्षणासाठी मदत करणे आणि त्यांना स्वतंत्रपणे उभे राहण्यासाठी प्रेरित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या मॅरेथॉन मध्ये शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता,शिरूर व रांजणगाव परिसरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांच्या उत्साही उपस्थितीमुळे या उपक्रमाला अधिक ऊर्जा मिळाली.
या कार्यक्रमाची काही प्रमुख वैशिष्ट्ये
- ग्रामीण खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद
- अनेक युवा धावपटूंनी चमकदार कामगिरी केली
- फिटनेस आणि आरोग्य जागरूकता
- स्पर्धेपूर्वी झुंबा डान्स आणि मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक
- स्पर्धकांसाठी उत्कृष्ट व्यवस्था टी-शर्ट, मेडल्स आणि हेल्दी ब्रेकफास्टचे वाटप
- आरोग्य सेवा विशेष वैद्यकीय मदत आणि ॲम्ब्युलन्स सेवा
- विशेष सोयीसुविधा पोर्टेबल बाथरूम आणि चेंजिंग रूम
- प्रेरणादायी संवाद मॅरेथॉननंतर कविता राऊत यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला
- त्यांच्या निरागस प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना प्रेरित केले
संघटनेचे योगदान आणि भविष्यातील संकल्प
हीलींग लाइफ संस्थेच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. मेजर संतोष सांबारे, विजय पाचंगे, डॉ.तुषार पाचुंदकर, संदीप सांबारे, सुनील पडवळ, भारती पडवळ, डॉ. निकिता तळेकर, डॉ. प्रणव हेशी, डॉ. क्षितिज शेठ, स्वप्निल फलके, अमृता फलके, संतोष शेवाळे, संतोष वाळके, ओंकार सरोदे, उज्वला इचके, उषाताई वाखारे व हीलींग लाइफ स्वयंसेवकांचे या यशस्वी आयोजनामध्ये मोलाचे योगदान होते.
"रन फॉर हर" - भविष्यातील ध्येय धोरणे
"रन फॉर हर" ही मॅरेथॉन पुणे विभागातील प्रतिष्ठेची स्पर्धा बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यंदाचा उत्साह पाहता पुढील वर्षी हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे. सर्व सहभागी, स्वयंसेवक आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार रन फॉर हर मॅरेथॉन(ही लिंग लाईव्हस) च्या वतीने व्यक्त केले. आणि"रन फॉर हर 2026" साठी पुन्हा भेटूया! हा संदेश यावेळी देण्यात आला .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा