परिसरात व्यक्त केले जात आहे हळहळ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील खावली गाव सासर असलेल्या आणी पानस माहेर असलेल्या सौ.स्वाती सुरेश शेलार वय ३५ या आपल्या ३ मुलांन सोबत पती सुरेश नवलु शेलार वय ४० यांच्या सोबत राहत होत्या पण आज दि .१२ डिसेंबर रोजी सकाळी ८ /३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील पडवीतील कळकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावासह वाईच्या पश्चिम भागातील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबतची तक्रार मयताच्या जाऊबाई असलेल्या आश्वीनी तानाजी शेलार वय ३२ राहणार खावली ता .वाई यांनी वाई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत मुंगसे करीत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा