happy new year 2025, shivshahi news,

 

पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघावर अटीतटीच्या लढतीत काशिनाथ दातेंचे दणदणीत यश

महाविकास आघाडीच्या राणी लंके २४०६ मतांनी पराभूत

Kashinath date sir, Rani Nilesh lanke, election, parner, ahamadnagar, ahilya nagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)

पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते हे महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यावर २४०६ मतांनी अतिशय अटी तटीच्या लढतीत विजयी झाले आहेत.

पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी च्या निकालात काही फेऱ्यांचा अपवाद वगळता महायुतीचे काशिनाथ दाते सर १ ल्या फेरीपासून सातत्याने आघाडीवर होते , त्यामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते अक्षरशः बुचकळयात पडत होते. क्षणा क्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचत होती. बऱ्याच वेळा मतमोजणीत काशिनाथ दाते पुढे जात होते , तर राणी लंके कधी थोड्या फार मतांनी पुढे जात सोशल मीडिया वर निकालाची चर्चा सुरू होती. पण निकाल १ ते दोन हजारांच्या आसपास रेंगाळत होता. अखेर २४ व्या फेरीच्या अखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना २४०६ मतांनी विजयी घोषीत केले, अन कार्यकर्त्यां चा उत्साह संचारला, डीजेचा दणदणाट , गुलांलाची उधळण व घोषणांच्या आवाजात विजय साजरा करण्यात आला. महाविकास आघाडी च्या उमेदवार राणी लंके यांना १ लाख १० हजार ३६९ , अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांना १० हजार ६४५ , अपक्ष व दातें ना पाठिंबा दिलेले विजय औटी ८५८ , माजी आमदार व अपक्ष विजय औटी २ हजार ४६४ तर अपक्ष सखाराम सरक यांना ३ हजार ५७२ मते मिळाली. 

लाडकी बहीण , एका घरात दोन पदे व इतर कारणांनी ही निवडणूक गाजली

नगर जिल्ह्यातील पारनेर व शेवगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत सर्वांत जास्त २७ बुथ असल्याने मतमोजणी ला वेळ लागणार , हे माहित असूनही कार्यकर्ते मतमोजणी केंद्रात ठाण मांडून बसले होते . अतिशय रटाळ व वेळ खावू प्रक्रिया राबविली गेली .

निवडणूक निर्णय अधिकारी चिंचकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी , तहसिलदार गायत्री सौंदाणे यांनी ही निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अतिशय बंदिस्त व कमी जागेत ठेवली होती. उमेदवाऱ्यांच्या प्रतिनिधीं ना बसण्यास ही जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे ते कंटाळून बाहेर येत होते . तर पत्रकारांसाठी मिडीया सेंटर मतमोजणी केंद्रापासून बाजूला ठेवले होते . केंद्रात ही जाण्यास पत्रकारांना प्रवेश ही नव्हता, अखेर ध्वनी क्षेपकांवर जाहीर होणारी निकालाची घोषणा ऐकून त्याची नोंद घ्यावी लागत होती.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !