४ सप्टेंबर बुधवार रोजी शहरातील सर्व पक्षीय बंदची हाक देण्यात आली होती
शिवशाही वृतसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी, ओझोन आरिफ शेख
सिंदखेराजा शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असून या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी चोरीचा तपास लावण्याच्या मागणीसाठी दिनांक ४ सप्टेंबर बुधवार रोजी शहरातील सर्व पक्षीय बंदची हाक देण्यात आली होत संपूर्ण शहरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे .अनेक हॉस्पिटल मेडिकल वगळता इतर आस्थापणे बंद होते,
सिंदखेड राजा शहरासह परिसरात सतत विविध चोरीच्या घटना घडत असून या घडलेल्या घटनेचा सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळत आहेत तरी देखील वाढते चोरीचे प्रमाण व चोरांचा शोध लागत नसल्यामुळे सिंदखेडराजा शहरातील नागरिक हैराण झाले आहेत विविध घटनांमुळे शहरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत त्या अनुषंगाने सिंदखेडराजा शहरातील सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी १ सप्टेंबर रोजी संत सावता भवन या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये शहरातील १०० ते २०० विविध पक्षाचे विविध संघटनेचे पदाधिकारी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते यावेळी सर्व शहर वासियांच्या वतीने सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस स्टेशन च्या गलथान कारभाराविरोधात व पोलिसांनी चोरांचा शोध लावण्यात संदर्भात शहरवासीयांनी दिनांक ४ सप्टेंबर रोजी शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता ४ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने दुकाने आस्थापने बंद ठेवून सहकार्य करण्यात आले होते याबाबत सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते.
तसेच एक सप्टेंबर रोजी एक महिला आपल्या नातवाला घेऊन सकाळी दर्शनाकरिता खंडोबा मंदिरामध्ये जात असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून अंगावरील सोन्या चांदीचे दागिने घेऊन पळून गेले होते,त्याचबरोबर सिंदखेडराजा पोलीस स्टेशन मध्ये अपुरे पोलीस कर्मचारी सुद्धा वाढवण्याची मागणी सिंदखेडराजा शहरवासीयांनी केली होती .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा