दरेगाव वाडी येथे गाव एकोप्याने शेतकऱ्यांचा पोळा सण साजरा
शिवशाही वृतसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी, शिवजी कूंटूरकर
दरेगाव वाडीमध्ये बैलपोळा अतिशय शांतपणे ढोल ताशाच्या गजरात कुठल्याच प्रकारचे गालबोट न लागता शेतकऱ्याने गाव एकोप्याने शेतकऱ्यांचा आणि बैलांचा पवित्र सण म्हणून ओळखल्या जाणारा पोळा सण साजरा करून गावाचा एक आदर्श पुढे ठेवला आहे.
प्रत्येक शेतकऱ्यांची बैल जोडी प्रमाणे बँड ताशा लावून त्यांची मिरवणूक काढून आपण बैलपोळा सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन साजरा करून आनंद व्यक्त केला व एक नवीन गावापुढे आदर्श ठेवून त्याबद्दल आम्ही सर्व गावकऱ्यांचे गावातील सर्व प्रतिष्ठान तर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन केले. इथून पुढे असेच एकमेकांशी सहकार्य असावे हीच अपेक्षा एकमेकांशी बाळगून गाव आनंदाने आणि एकमेकांच्या विचाराने पुढे जावावा चालावा अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आणि बैलाच्या खुराने शेती जेव्हा नांगरली जाते तेव्हा खोऱ्याने दक्षिणी घरात येते.
या बनी प्रमाणे राबराब राबणारे शेतकरी यांनी आपल्या आवडत्या सर्जा राजाची जोडी घेऊन दरेगाव वाडी येथे संपूर्ण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचा आणि बैलाचा पवित्र सण असलेला पोळा गाव एकोप्याने साजरा केला आणि गावाचा मोठेपणा राखून ठेवला आहे यावेळी युवा सेना उपतालुका मुदखेड चे नितीन मारुतराव माने शिवसेना शाखाप्रमुख बालाजी घारके शिवसेना शाखा सचिव अमोल पेशवाड सरपंच दीपक कोकले पोलीस पाटील श्री साहेबराव राहेरे सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत पाटील बोडके तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद गव्हाणे ग्रामपंचायत सदस्य संदीप बावणे अमोल बुचडे दिगंबर शिंदे यासह सर्व शेतकरी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा