शिवसेना ठाकरे गटांची मागणी
शिवशाही वृतसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मुदखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यांत यावी असे निवेदन शिवाजी पाटील गाढे युवा सेना तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्याची पिके अति जोमात आलेली असताना अनेक दिवसापासून आपल्या शेतात काबाडकष्ट करून सोन्यासारखी पिके जोमात आली होती परंतु अति पावसाने अतिवृष्टी झाली असून या शेतीच्या पिकाची अतोनात नुकसान झाली आहे तेव्हा मुदखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने त्वरित मदत करावी असे निवेदन मुदखेड शिवसेना ठाकरे गटाचे युवा तालुकाप्रमुख शिवाजी पाटील गाढे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि विविध गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर केले आहे यावेळी शिवाजी पाटील गाढे युवा सेना तालुका प्रमुख मुदखेड सचिन चेंद्रे, शहर प्रमुख अविनाश झमकडे शहर प्रमुख संभाजी दरेगावकर जिल्हा चिटणीस अनिल कुरे, उपतालुकाप्रमुख वाघजी गाढे, उपतालुकाप्रमुख सर्कल प्रमुख पंडित पाटील, प्रसाद जाधव, मोहन गाढे, श्रीप्रभू कुरे, किशन कुरे, बाबूसिंग गट राठोड गजानन कुरे भिमराव राठोड विजय पाटील व आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा