maharashtra day, workers day, shivshahi news,

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला सुरुवात

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू केले बेमुदत अन्नत्याग आंदोलन 

Ravikant Tupkar's movement begins, Sindkhedaraja , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख) 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिनांक ४ सप्टेंबरच्या दुपारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थानासमोर त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळीच आंदोलनाला सुरुवात करण्याआधी रविकांत तुपकर यांनी अतिवृष्ट ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर तुपकर हजारो शेतकऱ्यांसह सिंदखेडराजात पोहचले. राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन तुपकर आंदोलनस्थळी टाकलेल्या मंडपात पोहचले. तिथे उपस्थित शेतकऱ्यांना तुपकर यांनी संबोधित केले. 

आता शेतकरी एकवटला आहे. आपल्या आंदोलनाचा श्वास सोयाबीन कापूस आहे, आता आपला कुणी नेता नाही आता सोयाबीन हाच आपला नेता..मी केवळ निमित्त आहे, आता आपला लढा आपल्या शेतकऱ्यांनाच पुढे न्यावा लागेल. आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचे नाही. ही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई आहे असे तुपकर यावेळी म्हणाले.

अंबानी, अदानीचे कर्ज माफ करायला सरकारला वेळ आहे मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ का करत नाही? असा सवाल यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अद्याप जमा झाला नाही नेते तारखावर तारखा देत आहेत, ३१ ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची रक्कम जमा होईल असे नेते सांगत होते. तोपर्यंत आपण वाट पहिली मात्र आता आपली सहनशीलता संपली आहे.

 

या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका. जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत मी राजकीय भाष्य करणार नाही असेही रविकांत तुपकर म्हणाले. सोयाबीन कापसाच्या आंदोलनाचे केंद्र आता सिंदखेडराजा करायचे आहे. हे सरकार वारंवार सांगत असते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो. त्यामुळे छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानासमोर हे आंदोलन करीत आहोत, या सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी केल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !