शरदचंद्रजी पवार अभ्यासिका मंदिर कार्यालय व इतर सेवांचा शुभारंभ
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंतराव कवाद सर यांची दृष्टी वेगळी असून ते कोणालाही जमत नाही , ते फक्त त्यांनाच जमते . ही अभ्यासिका उभी करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
निघोज येथील शरदचंद्रजी पवार साहेब अभ्यासिका ही फक्त पारनेर तालुक्याला च नव्हे , तर नगर जिल्ह्या ला प्रेरणादायी ठरेल , असे गौरवोद्गार नगर दक्षिण चे खासदार डॉ . निलेश लंके यांनी काढले आहे .
निघोज येथे श्री मळगंगा देवस्थान ट्रस्ट कार्यालय , शरदचंद्रजी पवार अभ्यासिका , ट्रस्ट संचालित प्रसादालय , सेवा संस्थेच्या अगरबत्ती दालन व इतर कार्यक्रमांचा भव्य शुभारंभ खा . डॉ . निलेश लंके यांच्या हस्ते व श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शांताराम मामा लंके यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात संपन्न झाला .
यावेळी बोलताना खा . डॉ लंके पुढे म्हणाले की , या अभ्यासिके च्या माध्यमातून ज्ञानदाणाचे महत्वपूर्ण कार्य होणार असून मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट कार्यालय म्हणजे या अभ्यासिकेसाठी मिळालेली संजीवनी असून सुरुवातीला ही अभ्यासिका उभी करण्यासाठी जागेची अडचण आली , ती सोडविल्यानंतर यासाठी १० लाख रुपये दिले , पण हे काम होणार नाही , हे लक्षात आल्यावर पुन्हा मोठा निधी उपलब्ध करून आज उभी राहिलेली ही देखणी अभ्यासिकेची दीड कोटी रुपयांची वास्तू उभी राहिली . पुर्ण झाल्यावर याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते केले . ट्रस्ट ने या अभ्यासिके चे अतिशय छान पद्धतीने नियोजन केले आहे , अन्यथा अश्या मोठ्या वास्तूंची दुरवस्था होते . या अभ्यासिकेची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी .
निघोज परिसर हा बागायत व साक्षर आहे , निघोजला मिनी दुबई म्हटले जाते . तालुक्यात कोणताही व्यवसाय करायचा , तो फक्त निघोजकरांनीच . पण येथील मुलांची अधिकाऱ्यांच्या रूपाने वाणवा आहे , म्हणून ही भव्य अभ्यासिका दिली , अशीच अभ्यासिका कान्हुर पठारला ही दिली आहे . आगामी विधानसभा निवडणुकी नंतर आपल्या कडे राज्याच्या तिजोरी च्या चाव्या येतील , त्यामुळे घाबरून जावू नका , विकास कामांना निधी कमी पडणार नाही , निघोज परिसरातील शिवपाणंद रस्त्यांसाठी आतापर्यंत ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे . असे खा डॉ लंके शेवटी म्हणाले .
यावेळी पुणे येथील रयत प्रबोधीनीचे संस्थापक उमेश कुदळे, रयत प्रबोधीनीचे व्यवस्थापक विशाल लोंढे, बाजार समितीचे उपसभापती बापू शिर्के, उपकार्याध्यक्ष वसंत कवाद, ज्येष्ठ विश्वस्त व माजी सरपंच ठकाराम लंके , कोषाध्यक्ष अमृता रसाळ, सचिव शांताराम कळसकर, संघटक रामदास वरखडे, सहसचिव विश्वास शेटे, मुलिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे, विजय डोळ, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक मारुती रेपाळे, मळगंगा यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, विश्वस्त व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, ॲड . ज्ञानेश्वर लंके, शंकरराव लामखडे , संतोष रसाळ , आशाताई वरखडे , संदीप सालके , श्री पांडुरंग कृपा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लंके, उपाध्यक्ष दत्तात्रय गुंड, माजी उपसभापती खंडू भुकन, सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनिल वराळ, उपाध्यक्ष शांताराम लाळगे, आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश ढवण, पंचायत समिती माजी सदस्य किसनराव रासकर, सोपानराव भाकरे , सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर , शिवव्याख्याते ज्ञानेश्वर कवाद , पत्रकार सलीम हावलदार , राष्ट्रवादी सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे , ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद , माजी सदस्य दिलीप ढवण , विश्वस्त आशा ताई वरखडे , प्रसिद्ध वृक्षमित्र पोपटराव रसाळ , विघ्नहर्ता पतसंस्थेचे चेअरमन सुभाष साठे , सर्व विश्वस्त मंडळ , सोसायटीचे सर्व संचालक मंडळ , ग्रामपंचायत सदस्य, इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार डॉ लंके यावेळी पुढे म्हणाले की , आपला तालुका हा गुणवंतांचा तालुका म्हणून राज्यात नावलौकिक मिळविला आहे. यासाठी आपण तालुक्यात बहुसंख्य ठिकाणी अभ्यासिका देणार आहोत ,जेणेकरून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होईल व जास्तीत जास्त विद्यार्थी राज्यात उच्च दर्जाचे अधिकारी होऊन तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावला जाईल . मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने या ठिकाणी कार्यालय सुरू केले असल्याने अभ्यासिकेला एक संजिवनी मिळणार असून याठिकाणी रयत प्रबोधिनीचे संचालक उमेश कुदळे व व्यवस्थापक विशाल लोंढे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून साडे आठशे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झाले असून १ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष तर १० हजार विद्यार्थी दृकश्राव्य माध्यमांद्वारे जोडलेले गेलेले आहेत . या प्रबोधिनीचे काम राज्यात अग्रगण्य असल्याचे प्रतिपादन केले आहे , तर अद्यायावत फर्निचर साठी १० लाख देण्याचेही खा . डॉ . लंके यांनी जाहीर केले .
रयत प्रबोधिनीचे संचालक उमेश कुदळे यांनी यावेळी अभ्यासिका व मार्गदर्शन याविषयी सांगीतली. भगवान गड येथील साडेतीन कोटी रुपये अभ्यासिकेची माहिती दिली. तसेच येथील विद्यार्थ्यांना रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार असून सर्वाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल.
यावेळी ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले.
खासदार नीलेश लंके यांनी यावेळी ज्ञानदानाच्या पवित्र कार्यासाठी ग्रामस्थांनी सढळ हस्ते अभ्यासिकेसाठी पुस्तके व आर्थिक मदती देण्याचे आवाहन करताच उपस्थितांनी अडीच लाख रुपयांची मदत जाहीर केली . या सर्वांचे खासदार लंके यांनी धन्यवाद व्यक्त करीत जनतेने अशाप्रकारे मदत देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे आवाहन केले
येथील वृक्षमित्र पोपटराव रसाळ यांनी नोकरी व्यवसाया निमित्त संभाजी नगर येथे स्थायिक होत ६ वृक्ष बँका स्थापन केल्याचे गौरव पूर्ण उल्लेख ही खा डॉ . लंके यांनी केला .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा