पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवत हिंदू म्हणून एकत्र येण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
हिंदुत्ववादी विचारधारा जागृत ठेवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पारनेर तालुक्यातील वाळवणे ते पारनेर या दरम्यान ५०० पेक्षा जास्त मोटर सायकलची भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली.
काल शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी पवित्र श्रावण मासानिमित हिंदवी विचारधारा आयोजित हिंदू एकता रॅली व मेळावा अतिशय जल्लोषात पार पडला. हिंदवी विचारधारेच्या वतीने ‘हिंदू एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्र आणि धर्मप्रेमी पारनेर तालुक्यातील नागरिक मेळाव्यात सहभागी झाले होते.श्रावण महिन्या निमित्त भैरवनाथ मंदिर वाळवणे या ठिकाणी महादेवाचा अभिषेक करून भव्य हिंदू एकता रॅलीस सुरुवात झाली. यावेळी हिंदू युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत सुपा, हंगा या मार्गी रॅली पारनेर शहरामध्ये दाखल झाली. गणेश मंगल कार्यालय या ठिकाणी रॅली ची सांगता झाली.
हिंदुत्ववादी विचारसरणीच्या गीतांजली ताई झेंडे यांचे सुश्राव्य असे शिव शंभू चरित्र व्याख्यान सादर करण्यात आले. हंगा गावातील संगणक तज्ञ गौरव शिंदे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी मोठ्या संख्येने पारनेर तालुक्यातील सकल हिंदू युवक उपस्थित होता.
हिंदूंच्या संरक्षणासाठी यापुढच्या काळात लाठ्याकाठ्या घेऊन मारामाऱ्या करायची गरज नाही. परंतु बुद्धीच्या, लेखणीच्या बळावर या समाजाचे भले करण्यासाठी ‘हिंदू एकता’सारख्या संघटनांची अजूनही गरज आहे,
शिवशंभु व्याख्यात्या गीतांजली ताई झेंडे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा