खासदार निलेश लंके यांच्या हस्ते होणार विविध विकास कामांचे लोकार्पण
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
निघोज परिसर व पारनेर तालुक्यातील विविध स्पर्धा परीक्षांची पुर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थी स्पर्धा मार्गदर्शन अभ्यासिका , श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट कार्यालय व ट्रस्ट संचलित प्रसादालय यांचा भव्य शुभारंभ खासदार डॉ . निलेश लंके यांच्या हस्ते व श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट चे कार्याध्यक्ष शांताराम लंके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती उपकार्याध्यक्ष वसंतराव कवाद सर यांनी शिवशाही न्यूजला बोलताना दिली.
उपकार्याध्यक्ष कवाद सर पुढे म्हणाले की , पारनेर तालुका व परिसरातील विविध स्पर्धा परीक्षांची पुर्व तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थीनीं यांच्या पुर्व तयारी करण्यासाठी व पुढील भवितव्याचा विचार म्हणून खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या शरदचंद्र पवार साहेब स्पर्धा परीक्षा अभ्यासिका , राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री मळगंगा देवी मंदिराचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र्य व सुसज्ज कार्यालय उभे करण्यात आले व राज्यातून येत असलेले भाविक भक्तांच्या खास भोजनासाठी भाविक भक्त व लोकसहभागातून प्रसादालय सुरू करण्यात येणार आहे ,
याचा भव्य शुभारंभ खासदार निलेश लंके यांच्या हस्ते व श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट चे कार्याध्यक्ष शांताराम लंके यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा मार्ग केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले पुणे येथील रयत प्रबोधीनी चे संस्थापक उमेश कुदळे सर , व्यवस्थापक विशाल लोंढे सर , ट्रस्टचे विश्वस्त , ग्रामपंचायत पदाधिकारी , सेवा संस्था व निघोज मधील सर्व संस्थांचे पदाधिकारी , ग्रामस्थ या कार्यक्रमा साठी उपस्थित राहणार आहेत , अशी माहिती सचिव शांताराम कळसकर , कोषाध्यक्ष अमृता रसाळ , संघटक रामदास वरखडे , सहसचिव विश्वास शेटे यांनी दिली आहे .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा