आमदार ॲड.अशोक पवार व सुजाता पवार यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर येथील सविता अनिल बोरुडे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील नियुक्तीचे पत्र शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार व सुजाता भाभी पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवती प्रियंका धोत्रे, आदिशक्ती महिला मंडळ अध्यक्ष शशिकला काळे, आधार छाया फाउंडेशन सचिव प्रीती बनसोडे, रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी ताई कर्डिले व शिरूर शहर युवती अध्यक्ष गीतारानी आढाव आदी मान्यवर व महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा