maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपुरात मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने मनसे गौरव सन्मान सोहळा

ज्येष्ठ विधिज्ञांचा सहकुटुंब केला गौरव

Lawyers honored by MNS, raj thakarey, dilip dhotre, padharpur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेली अनेक वर्ष वकिली सेवा बजावून लोकांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र काम करणाऱ्या पंढरपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञांचा सहकुटुंब गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी वकील बंधूंशी संवाद साधताना दिलीपबापू धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व विधीज्ञांचे आभार मानून आपला परिचय करून देताना शालेय जीवनापासून आतापर्यंतचा राजकीय प्रवासाला उजाळा देत वकील बंधूंच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा विश्वास दिला.

यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि ज्येष्ठ विधिज्ञांचा शाल, फेटा आणि पैठणी साडी देऊन सपत्नीक सन्मान केला. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पंढरपूर आधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी येथील दाते मंगल कार्यालय सांगोला रोड पंढरपूर येथे करण्यात आले होते.

यावेळी पंढरपूर आधिवक्ता संघाचे अध्यक्ष राजेश चौगुले, उपाध्यक्ष महेश कसबे, सचिव अभयसिंह देशमुख, सदस्य निकिता अवताडे, विजयकुमार नागटीळक, समाधान गायकवाड, विलास साळुंखे, गणेश चव्हाण, रेखा यादव यांच्यासह पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !