शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अनेक युवकांचा प्रवेश
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षसृष्टीवर निष्ठा ठेवून शिवसेना तालुका युवाप्रमुख शिवाजी ईबितदार कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली युवा जिल्हाध्यक्ष अक्षय वट्टमवार आणि विधानसभा विस्तारक विशाल सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीपाल पुंडलिक मोरे यांची बरबडा युवा सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली तर प्रताप पंडितराव मोरे गुलाब शिवाजीराव मोरे शिवाजी माधवराव मोरे भागवत लोखडु मोरे, दीपक पंडितराव मोरे नागेश राजेश मोरे अभिजीत संजय मोरे यांची देखील शिवसेनेमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावर आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेवर निशीम प्रेम केले त्यांचा वारसा निष्ठेने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चालवीत आहेत आणि म्हणून त्यांच्या कार्यप्रणालीवर अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा उदात हेतू मनाशी बाळगून सदर नवोदित शिवसैनिकांनी प्रवेश केलेला आहे म्हणून नायगाव तालुका युवा शिवसेनाप्रमुख शिवाजी ईबितदार कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली सदर सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यांचा यावेळी सन्मान करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा