पद्मश्री पोपटराव पवार यांचे उपस्थितांना मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सदाम दरेकर)
केडगाव मधील कर्मयोगी योगा स्टुडिओच्या महिलांनी आदर्श गाव हिवरेबाजार मध्ये रविवारी सकाळी आहार तज्ञ आणि योगशिक्षिका ज्योती येणारे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गच्या सानिध्यात योगाचे धडे गिरवले यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीवर आधारित असलेल्या योगाचा स्वीकार केला आहे योगाने अनेक आजार विकार बरे होऊन आनंदी जीवनाचा लाभ घेता येतो अनेक दुर्धन आजारावर योगद्वारे मात करता येते असे त्यांनी सांगितले तसेच यावेळी महिलांसाठी प्राथमिक शिक्षिका शोभाताई पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली गावात गावात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी गावातील वृक्षारोपण व सेंद्रिय शेतीची माहिती दिली याप्रसंगी वसुधा दहातोंडे दामिनी सातपुते राधाबाई येणारे नयना पाळेकर संगीता गोरे तृप्ती देवकर चैताली बर्वे कल्याणी ठोबे शारदा रणसिंग मंगल आंधळे पुनम देशमुख जयश्री मेढे अर्चना गोडसे सविता आंधळे मीनाक्षी काटमोरे शोभा धामणे मेघा कावरे सुवर्ण चोरडिया आरती काळे शितल जांगडा लता सातपुते कल्पना पातारे मीना गवळी कल्याणी ठुबे प्रियंका सोनी विजया पाटील उपस्थित होत्या.
दररोज एक तास तरी योग साधनेचा अभ्यास करावा आजच्या धकाधकीच्या जीवनात योगसाधनेला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर आहाराविषयी ज्योती येणारी यांनी मार्गदर्शन केले. आजच्या जीवनात आहार आणि योग साधना यांचा समांतर राखण खूप गरजेचे आहे योगा करण्यासाठी वयाचे बंधन नसते त्याचबरोबर पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचं आहे कोणत्याही आजाराचं मूळ कारण म्हणजे आपली जीवनशैली याच्यावर अवलंबून असते आपला योग्य आहार आणि व्यायामाचे संतुलन जर व्यवस्थित ठेवले तर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये डायबेटिस थायरॉईड पीसीओडी किंवा प्रतिकारशक्ती कमी असणे त्वचेचे आजार हे आपल्याला होणार नाही किंवा कमी प्रमाणात असतील असे आहार तज्ञ व योगशिक्षिका ज्योती येणारे यांचे मत आहे त्याप्रसंगी त्या म्हटल्या की आजार झाल्यानंतर आहार आणि व्यायाम करण्यापेक्षा इथून पुढे आजार होऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीने आहार किंवा योग साधना करणे गरजेचे आहे जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य सुरळीत,आनंदी आणि समाधानी जाईल.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा